श्रीमती संतोषी ध्रुव माईलस्टोन अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित :नागपुर : उत्तर प्रदेश येथे राजधानी लखनौ येथील उर्दू . सभागृहात बुधवारी माईलस्टोन अचिव्हर्स अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शेकडो व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात देशभरातील लोक सहभागी झाले होते. नागपूरच्या श्रीमती संतोषी ध्रुव महाराष्ट्र टीव्ही शो डान्सर, मॉडेल, तायकांडो ब्लॅक बेल्ट, धावपटू यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ.बी के एस संजय, भारत गौरव डॉ.अनिता सहगल, डॉ. जयप्रकाश शर्मा, कॅप्टन आरके विक्रम सिंग यांची उपस्थिती होती. ज्यांच्या हस्ते समाजासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक यू पी टुडे चॅनल होते.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ.बी के एस संजय सहभागी झाले होते. मुख्य संपादक शोएब गाझी यांचे कौतुक करतांना पाहुण्यांनी सांगितले की, शोएब एक व्यक्तीच नाही तर एक व्यक्तिमत्व देखील आहे. ज्याच्या माध्यमातून एक भव्य आणि यशस्वी कार्यक्रम झाला. या भारत गौरवादरम्यान डॉ.अनिता सहगल वसुंधरा यांनाही यूपी टुडे चॅनलची ब्रँड अम्बेसेडर बनविण्यात आले. याप्रसंगी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते………….
