395350318 333671085919970 5605353992050335458 n

नूतन रेवतकर यांची महाराष्ट्र प्रदेश “संघटन सचिव” या पदावर नियुक्ती.

नूतन रेवतकर यांची महाराष्ट्र प्रदेश “संघटन सचिव” या पदावर नियुक्ती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व महिला अध्यक्षा तसेच सध्याच्या नागपूर शहर मुख्य प्रवक्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असलेल्या नूतन रेवतकर यांना करत असलेल्या कामांची उत्तम भेट म्हणून पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेश ‘संघटन सचिव’ या पदावर पदोन्नती देण्यात आली. नूतन रेवतकर यांची ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे माजी मंत्री जयंतजी पाटील साहेब यांनी केली. नूतन रेवतकर यांची नियुक्ती राज्याचे माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख साहेब यांचे प्रयत्नाने झाली असून अनिल बाबू देशमुख त्यांच्याच हस्ते नूतन रेवतकर यांना हे नियुक्ती पत्र सुपूर्द करण्यात आले. आपण करत असलेल्या कार्याची पक्षाने दखल घेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिल्याबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब खा. सुप्रियाताई सुळे , मा. मंत्री जयंतजी पाटील साहेब, माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख साहेब , नागपूर शहर अध्यक्ष दूनेश्र्वर पेठे , युवानेते सलील दादा देशमुख तसेच पक्षातील सर्वांचे मनःपूर्वक आभार नूतन रेवतकर यांनी यानिमित्ताने मानले.